मुंबई : पाणी हे जीवन आहे. पाणी हा मानवी जीवनाचा मुलभूत घटक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचे अपार महत्त्व आहे. अन्नग्रहण, पचनसंस्था, शरीरातील तापमानाचे समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. स्वस्थ आरोग्यासाठी दररोज 8 ते 12 ग्लास (2 ते 3 लीटर ) पाणी पिणं गरजेचं असतं. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी पाणी तर आवश्यक आहेच पण ते स्वच्छ, शुद्ध आणि रोग जंतुविरहीत असावे लागते. पाण्यामधून अनेक प्रकारचे विषाणू, जीवाणू शरीरात जाऊन आपले आरोग्य बिघडवू शकतात. त्यामुळे स्वच्छ, शुद्ध, योग्य प्रमाणात क्षार असलेले, प्राणवायूयुक्त पाणी आरोग्यासाठी हितावह आहे.

आयुर्वेद ही चिकित्सा पद्धती प्राचीन काळापासून आपल्या देशात आस्तित्वात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही आयुर्वेदाचे महत्त्व अबाधित आहे. त्यामुळे अनेक आजारांवर आयुर्वेदिक उपचार फायदेशीर ठरतात. आयुर्वेदाच्या शास्त्रात तुळस, सुंठ, दालचिनी, पिंपळी, गुळवेल, अश्वगंधा इ. अनेक गुणकारी, उपायकारक तत्वांचा वापर केला जातो.

रोजच्या पिण्याच्या पाण्यात जर अशा आयुर्वेदिक तत्वांचा वापर केला तर ते आरोग्यासाठी अंत्यक परिणामकारक ठरु शकतात आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत होऊ शकते. आयुर्वेदातील तुळस ही श्वसनाचा विकार बरं करण्यास मदत करते. सुंठ ही सर्दी आणि खोकल्यावर उपायकारक आहे. दालचिनी शरिरातील तापमान समतोल राखण्यास मदत करते. पिंपळी ताप, दमा यांच्यावरच्या उपचारात मदत करते. गुळवेल रोगप्रतिकारक क्षमता वाढवाण्यास मदत करते. अश्वगंधा उर्जा आणि शक्ती वाढवण्यास मदत करते.

सध्याचा काळ आरोग्याच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचा आहे. संपूर्ण जग कोरोनासारख्या भयंकर आजाराचा सामना करत आहे. अशा आरोग्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत आपण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणं, ही महत्त्वाची बाब आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पाणी उकळवणे, शुद्ध करणे, आयुर्वेदिक तत्वांचा वापर करणे हे प्रत्येकाला वेळेअभावी अवघड जाते. सध्याच्या मानवी वेगवान जीवनपद्धतीत पाण्यासारख्या जीवनावश्यक घटकाकडे दुर्लक्ष होऊ शकते. कुटुंबातील प्रत्येकाने घरी, जेवणानंतर, दुपारी ऊन्हाच्यावेळी, कामाच्या ठिकाणी, प्रवास करताना, खेळ व्यायाम यानंतर पाणी पिताना वेळोवेळी योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. पण हे प्रत्येकालाच जमेल असे नाही म्हणूनच शेळके ग्रुपच्या Oxycool ह्या ब्रँडने आयुहेल्थ हा अंत्यत कल्पक प्रकल्प राबवला आहे.

पाणी ज्यामध्ये आहे तुळस, सुंठ, दालचिनी, पिंपळी, गुळवेल, अश्वगंधा अशी सहा आयुर्वेदिक तत्व. यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत होऊ शकते. भारतातील सर्वात प्रथम राबवलेला कल्पक आणि प्रभावकारी प्रकल्प असून आयुर्वेदिक शास्त्रानुसार रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास आयुहेल्थ निश्चितच मदत करु शकते. आयुहेल्थ या नावातच आयु म्हणजे आयुष्य आणि हेल्थ म्हणजे आरोग्य. आयुहेल्थ हे एक पाणी आधारित पेय आहे. आयुहेल्थ हे आरोग्यासाठी अंत्यत मोलाचं असून यामधील आयुर्वेदिक तत्व शरिरास निरोगी ठेवण्यास मदत करतात. दिवसभरात 2-4 ग्लास जर आपण आयुहेल्थ प्यायले तर आपल्याला ते फायदेशीर ठरु शकते.

सगळ्या वयोगटातील लोकांसाठी म्हणजे लहान मुलांपासून ते जेष्ठांपर्यत आयुहेल्थ उपयोगी ठरेल. अंत्यत ताजे, योग्य पोषक तत्वे , भरपूर प्रमाणात प्राणवायू आणि तुळस, सुंठ, दालचिनी, पिंपळी, गुळवेल, अश्वगंधा यासारखी सहा आयुर्वेदीक तत्व असलेलं OxycoolAyuhealth हे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करेल. सध्याच्या आरोग्याच्या दृष्टीने कठीण परिस्थितीत, निरोगी आयुष्यासाठी, असा लोकोपयोगी प्रकल्प शेळके ग्रुपने राबवला आहे.
रोज प्या, कमी आजारी पडाल.

Source link

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.