हेमंत चापुडे, झी मिडिया शिरूर पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष असल्याचा हल्लाबोल भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याचा घणाघात दरेकर यांनी केला. पुणे जिल्ह्यातील शिरूर इथं क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. 

16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांचा प्रवेश होणार आहे. सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावरुन भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसला टोला लगावला आहे.

भाजपने आता कुऱ्हाड हाती घेतली आहे

भाजपच्या (BJP) एका हातात कुऱ्हाड तर दुसऱ्या हातात कमळ आहे. कुऱ्हाड हि अन्याय अत्याचाराच्या विरोधात उघारली जाते, राज्यात जिथे जिथे महिला अत्याचार होईल तिथे-तिथे हातात कुऱ्हाड घेणार असल्याचं प्रविण दरेकर यांनी यावेळी म्हटलंय

राज्यात होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात भाजपाने कुऱ्हाड हातात घेतली आहे. आता आयऱ्या गयऱ्यांच्या भीतीला घाबरायचे नाही. यांची सत्ता म्हणजे आढवावरचे पाणी, रात्री पण महिती नसतं सकाळी राहिलं का..! तीन पक्ष सरकारमध्ये एकत्र आहेत. मात्र रोज एकमेकांचे कपडे काढायचे काम करतात असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला आहे.

सरकारचं प्राधान्य सत्ता टिकवण्यात

राज्यात महिलांवर अत्याचार, बलात्कार,विनयभंग होत आहेत. पुण्यनगरीत एक दिवस असा नाही कि बलात्कार अत्याचार होत नाही. राज्यातील या अत्याचार, बलात्काराच्या घटना घडतात या सर्व गोष्टीला सरकारचा नाकार्तेपणा जबाबदार असुन सरकारचा गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश नाही, यांचं प्राधान्य अत्याचाराच्या घटना थांबविण्यासाठी नाही तर सत्ता टिकविण्यासाठी सुरुय असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे.

राज्यात सात वर्षापासुन बैलगाडा शर्यतीवर बंद आहे पुढील काळात बैलगाड्यांचे घाट भरतील आणि शर्यतीच्या मागे भाजपा ताकदीने उभी राहिल असा विश्वास प्रविण दरेकरांनी व्यक्त केला आहे.

Source link

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.