भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या आरोपी अनुप टिकाराम वालदे वय 31वर्षे, पोलिस नाईक, याला 500 रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. तक्रारदार याचा ट्रक पोलीस स्टेशन मोहाडी येथे रेती चोरीच्या गुन्हयात अडकवून ठेवलेला असून त्याचा सुप्रतनामा मिळण्याकरिता तक्रारदार याने न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्याकरिता न्यायालयाने तक्रारदार यांना उत्तर सादर करण्याकरिता नोटीस काढली असता ती तक्रारदार याला तमिल केल्याचा मोबदला म्हणून आरोपी याने 500/- रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने आरोपी असताना आज सापळा कारवाही करत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
