
भंडारा : कोरोनामुळे जिल्ह्यात आज आणखी 24 जणांचा मृत्यू झाला. तर, 1 हजार 478 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32 हजार 460 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.09 टक्के आहे. पाच हजार 855 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले. . जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये भंडारा तालुक्यातील 574, मोहाडी 102, तुमसर 152, पवनी 222, लाखनी 157, साकोली 185 व लाखांदुर तालुक्यातील 86 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 20 हजार 481 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात 11 हजार 507 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 24 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 472 झाली आहे.