बुलंद आवाज न्यूज नेटवर्क

भंडारा : जिल्ह्यात आज कोरोना बाधित १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १ हजार ४४६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८ हजार २५१ झाली आहे.
आज ८ हजार ४६९ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत २ लाख ४८ हजार ९३६ व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये भंडारा तालुक्यातील ५२७, मोहाडी ११४, तुमसर १४७, पवनी २०८, लाखनी १९६, साकोली १८४ व लाखांदुर तालुक्यातील ७० व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत १८ हजार २० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता ९ हजार ८११ क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण ४२० झाली आहे.
 

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.