भंडारा : जिल्ह्यात आज ५६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला. रुग्णांची संख्या १७ हजार ६४५ झाली आहे.
            आज दोन हजार १४१ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ५६६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत १ लाख ७७ हजार २५० व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली.
            जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये भंडारा तालुक्यातील २८१, मोहाडी ५०, तुमसर ४७, पवनी १२५, लाखनी २४, साकोली १६ व लाखांदुर तालुक्यातील २४ व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत १४ हजार ७६० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता दोन हजार ५४२ क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण ३४३ झाली आहे.
 

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.