बुलंद आवाज न्यूज नेटवर्क

भंडारा : जिल्ह्यात आज ४३९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६ हजार ७८९ झाली आहे.
          आज १ हजार ८०३ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ४३९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत १ लाख ७३ हजार ६६ व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील २२६, मोहाडी १४, तुमसर २८, पवनी ६४, लाखनी ६०, साकोली ३१ व लाखांदुर तालुक्यातील १६ व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या १६ हजार ७८९1 झाली असून २ हजार ५२ क्रियाशील रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण ३३७ झाली आहे.

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.