बुलंद आवाज न्यूज नेटवर्क

भंडारा : जिल्ह्यात आज २८५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, दोघांचा मृत्यू झाला.
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६ हजार १५० झाली आहे. आज दोन हजार २०३ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी २८५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत १ लाख ६९ हजार ६७२ व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये भंडारा तालुक्यातील ११८, मोहाडी १७, तुमसर ४७, पवनी ४२, लाखनी ३८, साकोली २० व लाखांदुर तालुक्यातील ०३ व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत १४ हजार १५२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता एक हजार ६६४ क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आता ३३४ वर पोहचली आहे.

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.