
भंडारा : जिल्ह्यात आज कोरोना बाधित १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १ हजार ५९६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९ हजार ८४७ झाली आहे.
आज २ हजार ८६४व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत २ लाख ५१ हजार ८०० वेक्तिंच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये भंडारा तालुक्यातील ७०७, मोहाडी ११०, तुमसर २०६, पवनी २२४, लाखनी ११५, साकोली ६५ व लाखांदुर तालुक्यातील १६९ व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत १८ हजार ८०९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता १० हजार ६०२ क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या १६ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण ४३६ झाली आहे.