बुलंद आवाज न्यूज नेटवर्क

भंडारा : कोरोनामुळे जिल्ह्यात आज आणखी १२ जणांचा मृत्यू झाला. तर, १ हजार १३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३० हजार ९८२ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३.४१ टक्के आहे. आज नऊ हजार २४३ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत २ लाख ६१ हजार ४३ व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये भंडारा तालुक्यातील ४६०, मोहाडी १०६, तुमसर ७६, पवनी १२६, लाखनी १११, साकोली १५४ व लाखांदुर तालुक्यातील १०२ व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत १९ हजार ६४६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात १० हजार ८८८ क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण ४४८ झाली आहे.
 

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.