भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळावी नाही. यासाठी त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी हायवे मृत्युंजय दुत योजना अस्तित्वात आणली आहे. मात्र, महामार्ग पोलिसांकडे साधन उपलब्ध नसल्याने मदत देताना अडचण निर्माण होत होत्या. ती अडचण लक्षात घेऊन वरठी येथील सनफ्लॅग कंपनीने राष्ट्रीय महामार्ग पोलिसांना मदतीचा हात दिला. यातून त्यांनी १०० उपचार किट आणि ५० स्ट्रेचर दिले आहे.
सनफ्लॅग कंपनीमध्ये पार पडलेल्या छोटेखानी समारंभात हे सर्व साहित्य महामार्ग पोलीस पथकाच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी सनफ्लॅग कंपनीचे डायरेक्टर ऑफ टेक्निकल रामचंद्र दळवी, एचआर असोसिएशन प्रमुख सतीश श्रीवास्तव, सुरक्षा अधिकारी जवाहरलाल गुप्ता, एचआर व्यवस्थापक समीर पटेल, महामार्ग पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, पोलीस उपअधीक्षक संजय पांडे, पोलीस निरीक्षक वैशाली वैरागडे, गडेगाव महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी अमित कुमार पांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पोलीस महासंचालक (वाहतूक) भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून राज्यात महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मृत्युंजय दूत संकल्पना अस्तित्वात आणली आहे. या संकल्पनेच्या अनुषंगाने जर कुठे राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडल्यास त्या अपघातग्रस्तांना वेळीच उपचार मिळावा, हा या मागील उद्देश आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी ही नवसंकल्पना अस्तित्वात आणली असून त्याचा अनेकांना लाभ मिळाला आहे.
महामार्ग पोलिसांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या योजनेची माहिती पोलीस उपअधीक्षक संजय पांडे, गडेगाव मदत केंद्राचे प्रभारी अमितकुमार पांडे यांनी वरठी येथील सनफ्लॅग कंपनीच्या वरिष्ठांना दिली. या सामाजिक उपक्रमात सनफ्लॅग कंपनीने मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने कंपनीने १०० प्राथमिक उपचार केले व ५० स्ट्रेचर महामार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.


सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्यांची निवड
महामार्गावर होणार या अपघातानंतर त्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या यांची महामृत्युंजय म्हणून निवड करण्यात आली आहे. यात महामार्गावरील प्रतिष्ठाने ज्यात धाबा, पेट्रोल पंप व अन्य प्रकारचे उद्योग व्यवसायिक किंवा ग्रामस्थ यांची प्राधान्याने निवड करण्यात आली.

दुतांना मोफत प्रशिक्षण
अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी या मृत्युंजय दुतांना प्राथमिक उपचार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हे प्रशिक्षण देऊन त्यांना जखमींवर प्राथमिक उपचार कसे करायचे व त्यांना कशाप्रकारे दिलासा द्यायचा याचे प्रशिक्षण देण्यात आले.

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.