
भंडारा : फ्रंट लाईन वर्कर असलेल्या स्थानिक पत्रकारांचे लसीकरण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. आज गुरूवार स्थानिक विश्रामगृहात हे लसीकरण पार पडले.
जिल्ह्यात पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून व्हॅक्सीनेशन करण्याची मागणी पत्रकार संघाने जिल्हा प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाने मागणी मंजूर करून विश्रामगृह येथे पत्रकारांना लसीकरण करण्यासंदर्भात शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १८ ते ४५ वयोगटातील पत्रकारांचे लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, प्रशांत देसाई, नेहाल भुरे, दिलीप देशमुख, ज्ञानेश्वर मुंदे, नंदकिशोर परसावार, राकेश चेटुले, सुरेश कोटगले, समशेरखान, अभिजीत घोरमारे, हिवराज उके, बबन मेश्राम, उदय राऊत, प्रतिक तांबोळी, प्रशांत निखाडे, राजू मस्के यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.