भंडारा शहरात रेमडिसिवीर इंजेक्शनची काळाबाजारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे, यावर्षी कोरोनानी अक्षरशा थैमान घातला आहे, काही लोक रेमडिसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजन करीता धावपळ करीत आहेत, अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले तर काही लोक याच संधीचा फायदा घेत रेमडेसिविर इंजेक्शन याची काळाबाजारी करत टाळुवरची लोणी खाण्याचा काम करीत आहेत, अशीच काहीशी माहिती पोलीस अधीक्षक यांना मिळतात त्यांनी एक टीम तयार करत इंजेक्शनची काळाबाजारी करणार्‍यांकडे एक बनावट ग्राहक पाठविला असताना या दोन व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे, तर त्यांच्याकडून ४ इंजेक्शन आढळून आल्याने दोन्हीं लोकांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यामध्ये आणखी तीन लोक सहभागी असल्याचा निदर्शनात आले त्यामध्ये रुग्णालयातील दोन नर्स आहेत, ह्याच नर्स रेमडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देत होते त्यानुसार पोलिसांनी दोन नर्स यांच्या घराची झडती घेतली असताना त्यांच्या घरून औषधीच्या मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला आहे, कोरोनाच्य काळात रेमडिसिवीर इंजेक्शनची काळाबाजारी करणाऱ्या प्रकरणी पाच लोकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
या कारवाही मुळे काळाबाजारी करणाऱ्या लोकांना चांगलीच धास्ती भरली आहे,

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.