चुल आणि मूल या मानसिकतेच्या पलीकडे जाऊन सौंदड येथील महीला आता आत्मनिर्भरतेचे धडे गिरवू लागल्या आहेत. स्थानिक युवा नेटवर्क मैत्री मंचच्या माध्यमातून त्यांना कच्चा माल पुरवठा व प्रशिक्षण देण्यात आलाय. या माध्यमातून महिलांनी आकर्षक राख्या तयार केलेल्या आहेत. लवकरच त्यांची प्रदर्शनी देखील भरवण्यात येणार असून विक्रीसाठी या आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध होणार आहेत.
केवळ राखी निर्मितीच नव्हे तर वर्षभर साजरे होणारे सण उत्सवात उपयोगी साहित्य निर्मितीचे नियोजन मैत्री मंचाने केल्याचे सांगितले आहे. राखी, रांगोळी, आकाश कंदील, बांगड्या निर्मिती, कापड सिलाई व घर सजावटीचे ईतर साहित्य निर्मितीचे काम सुरू करण्याची तयारी महिलांनी सुरू केली आहे. या संदर्भात सांगण्यात आले आहे की, ५ नोव्हेंबर २०१६ ला रोशन शिवणकर यांनी युवा नेटवर्क मैत्री मंचची स्थापना करून महिलांना एकत्र केले व त्यांच्या अंगातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केले. सन २०१६ पासून विविध सामाजिक उपक्रम व सेवाभावी कार्य युवा नेटवर्क मैत्री मंचच्या माध्यमातून करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणजे युवा नेटवर्क मैत्री मंचच्या संयोजिका गायत्रीताई इरले यांनी महिलांच्या हाताला काही काम मिळावा म्हणून युवा नेटवर्क मैत्री मंच च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राखी तयार करणे बाबत विचार व्यक्त केले असता त्यांचे विचार सर्वांना आवडले. ना नफा ना तोटा या तत्वावर काम करण्याचे ठरविण्यात आले. राखी तयार करण्याकरिता कच्चामाल खरेदी करण्याकरिता ३० हजार रुपये व राखी पॅकिंग साहित्य करिता १० हजार रुपये असे ४० हजार रुपयांची गुंतवणुक रोशन शिवणकर यांनी केली. यापुढे देखील महिलांना वर्षभर काम मिळावा याकरिता नियोजन केले जात आहे. युवा नेटवर्क मंत्री मंच सदस्यांद्वारे राख्या तयार करण्यात आल्या असून पॅकिंग करण्याचे काम सुरू आहे. लवकरच गावातील काही ठराविक ठिकाणी प्रदर्शनी लावून ज्या किंमतीमध्ये राखी तयार झाली त्याच किमंतीमध्ये गावातील महिलांना राखी विक्री करण्यात येईल. इतर राख्या खुल्या बाजारात विकले जाईल. सदर कामाकरिता युवा नेटवर्क मैत्री मंचच्या मार्गदर्शक मीनाक्षी विठ्ठले, तालुका सचिव सुदेक्षणा राऊत, शहर सचिव दुर्गा इरले, सुरेखा नंदरधने यांनी सुद्धा पुढाकार घेतला असून शहर कोषाध्यक्ष ज्योती बर्वे, शालू भैसारे, लता हटकर, मनिषा निंबेकर, किर्ती कडुकार, मंजिरी इरले, अंजु इरले, नलीनी सावरकर, प्रिया राऊत, सुषमा डोये, माधुरी यावलकर, कल्पना गायधने, सुरेखा निंबेकर ह्या परिश्रम घेत आहेत. आत्मनिर्भर महिलांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला असून अर्थोत्पादनाबरोबरच महिलांचे कला कौशल्य या अनुषंगाने विकसित होत असल्याचा समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकतो आहे.

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.