भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरातील पंचशील वार्डातील हरीश पोगडे यांच्या घरामागील असलेले अतिक्रमण २४ तासात काढावे असे नगरपरीषदेने मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पत्र दिले होते, पण अतिक्रमण काढला नाही म्हणुन स्वतः मुख्याधिकारी माधुरी मडावी जेसीबी ताफ्यासह अतिक्रमण हटविण्याकरीता घटनास्थळी दाखल झाल्या व स्वतः हातात हतोळा घेतं अतिक्रमण काढायला सुरुवात केली.

पण काही वेळातच त्या ठिकाणीं काही राजकारणी लोक पोहचले व आपण पोगडे यांचा अतिक्रमण हेतू पुरस्पर काढत असल्याचा आरोप मुख्याधिकारी यांच्यावर केलें व एकेरी भाषेचं वापर सुद्धा केला आहे, तर अतिक्रमण धारक महिलेने मुख्याधिकारी यांच्यावर लोखंडी हातोळा उचलला मात्र मुख्याधिकारी यांनी वेळीच सावध झाल्याने मुख्याधिकारी ह्या थोडक्यात बचावल्या आहे, त्यामुळे अतिक्रम काढायला गेलेल्या अधिकाऱ्यावर हल्ला झाला असल्याने हि घटना निंदनीय आहे,