
जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कोविड 19 च्या लसीचा दुसरा डोज घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी लाखांदूर तालुक्यातील सोनेगाव केंद्रात लस घेतली. ‘मी लस घेतली, तुम्हीही घ्या’ आणि ‘लसवंत’ व्हा असा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. लस सुरक्षित असून कुठलाही गैरसमज मनात न ठेवता तसेच अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करुन घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.