भंडारा :- कोविड या संसर्गजन्य आजाराचा नवा व्हेरियंट म्हणून गणला जाणाऱ्या डेल्टा प्लस विषाणूचा भंडारा जिल्ह्यात एक रुग्ण आढळला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता असून सध्यातरी या रुग्णाच्या संपर्कातील कोणालाही डेल्टा प्लसची लक्षणे आढळून आली नाहीत. रुग्ण बरा झाला आहे.

कोरोनाचा पुढील विषाणू म्हणून डेल्टा प्लस आहे. सध्या राज्यात या विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. भंडारा जिल्ह्यात एक रुग्ण आढळून आला. भंडारा तालुक्यातील या रुग्णाच्या स्त्रावाचे नमुने जून महिण्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. लक्षण नसलेल्या या रुग्णाचा अहवाल आला आहे. दरम्यान हा रुग्ण बरा झाला असून त्याच्या संपर्कातील कोणालाही डेल्टा प्लसची लक्षण नाहीत.

डेल्टा प्लसचे जिल्ह्यात आगमन झाले असून नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. कोरोना या विषाणूवर ‘लस’ हाच एकमेव उपाय असून नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे व स्वत:ला या आजारापासून दूर ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.