भंडारा शहरालगत असलेल्या बेला येथे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास विशालवृक्ष ट्रकवर कोसळले. यात चालकाला किरकोळ दुखापत झाली. वृक्ष कोसळल्याने वाहतूक खोळंबली. यामुळे भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक ते मुजबी पर्यंत वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याची माहिती मिळताच भंडारा पोलीस, वाहतूक नियंत्रण शाखा, गडेगाव महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस पथक पोहोचले. त्यांनी स्थानिकांची मदत घेऊन महामार्गावर कोसळलेले वृक्ष क्रेनच्या मदतीने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.