

भंडारा: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळता यावे आणि किराणा व्यावसायिक आणि नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी किराणा अँड जनरल असोसिएशनची महत्वाची बैठक आज शुक्रवारला पार पडली. भंडारा किराणा अँड जनरल असोसिएशनचे अध्यक्ष मनोज संघानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने १७ ते २० एप्रिलपर्यंत भंडारा शहरातील सर्व किराणा दुकाने बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.