भंडारा पवनी मार्गावरील भंडारा तालुक्यातील पालगाव येथील उमा प्लास्टिक कंपनीमध्ये भीषण आग लागली. या भीषण आगीत कंपनीतील सर्व प्लास्टिकचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. ही दुर्घटना आज मंगळवारला सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते. मात्र, कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे.

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.