भंडारा जिल्ह्यातील धारगाव येथील श्रीराम नंदेश्वर यांच्या पडक्या घरात अस्वल दडून बसली होती, अस्वल दिसताच गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली त्यांनतर वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल होत अस्वलीला बाहेर काडण्यासाठी रेस्कू ऑपरेशन सुरू केला , जेसीबीच्या सहाय्याने कचरा साफ करत पिंजरा लावण्यात आला काही वेळातच अस्वल पिंजऱ्याच्या दिशेने पळाली व पिंजऱ्यात घुसली परंतु उपस्थित ग्रामस्थांच्या मोठ्या आवाजामुळे परत फिरून बाहेर आली व सैरावैरा पळू लागली . त्यानंतर वनविभागाच्या टीमने फटाके फोडून अस्वलीला गावाच्या बाहेर शेतीमधुन जंगलाच्या दिशेने कोणालाही ईजा न होता सुखरूपरित्या पळवुन लावले व रेस्क्यू यशस्वीपणे पुर्ण केला .

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.