मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा साहित्य अकादमी आयोजित अखिल भारतीय युवा लेखक संमेलनात देव बाभळी नाटकाचा लेखक प्राजक्त देशमुखला स्थान देण्यात आलं आहे. संपूर्ण भारतातून विविध विषयांवर नाटक लिहिणारे युवा लेखक यात सहभागी होणार आहेत. त्यात प्राजक्त एकमेव मराठी नाटककार आहे. शिवाय, या संमेलनात तो त्याच्या पहिल्या नाटकाबद्दल बोलणार आहे. हा वेबीनार बुधवारी, 16 जूनला होणार आहे.

याबद्दल एबीपी माझाशी बोलताना प्राजक्त म्हणाला की, "काही दिवसांपूर्वी मला साहित्य अकादमीतून यासंबंधी फोन आला. माझं नाव त्यांच्याकडे कसं गेलं याची मला कल्पना नाही. पण साहित्यातले अनेक जाणकार नव्या निर्मितीवर लक्ष ठेवून असतात. त्यातून माझं नाव तिकडे गेलं असेल. त्या सेमिनारची माहीती मला देण्यात आली. त्यात मी माझ्या पहिल्या नाटकाचा अनुभव सांगणं अपेक्षित आहे. या सेमिनारमध्ये मी माझी पहिली कविता, पहिला लेख, पहिली एकांकिका असं सांगेन. हिंदी भाषेत हा संवाद असेल. दुपारी तीन ते सव्वाचार अशा वेळेत साहित्य अकादमीच्या यूट्यूब पेजवर ते पाहता येणार आहे.

प्राजक्त देशमुखने लिहिलेल्या देवबाभळी या नाटकाने समीक्षक-प्रेक्षकांची मनं जिंकली. भद्रकाली या नाट्यसंस्थेने हे नाटक रंगमंचावर आणलं. या नाटकात शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी या अभिनेत्री काम करतात. मराठी प्रेक्षकांनी नाटकाचं कौतुक केलंच. शिवाय, अनेक हिंदी-अमराठी नाट्यकर्मींनीही या नाटकाची भरभरून स्तुती केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अजिंक्य देव यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, ‘जय भवानी जय शिवाजी’मध्ये बाजीप्रभू देशपांडे साकारणार!

20 Years of Lagaan : 20 हजारांवरही ‘लगान’मध्ये काम करण्यासाठी तयार होता अभिनेता; प्रत्यक्षात मिळालं 2 लाखांचं मानधन

Sanchari Vijay : राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता संचारी विजयचं अपघाती निधन

Sooryavanshi Release Date : …तरच ‘सूर्यवंशी’ 13 ऑगस्टला येणार!

Source link

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.