भंडारा :- जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत अनुकंपा तत्वावर द्यावयाच्या नियुक्तीची विविध संवर्गातील 40 पदे भरण्यात आली असून सर्व संवर्गातील द्यावयाच्या पदोन्नतीसाठी 27 ऑगस्ट रोजी सभा आयोजित करण्यात आली असून त्यानंतर पदोन्नतीची पदे भरण्यात येणार आहेत. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला अनुकंपा भरतीचा विषय मार्गी लागला आहे. मागील दहा वर्षात अनुकंपा तत्त्वावर भरलेली ही सर्वाधिक पदे आहेत. यापूर्वी 2014 मध्ये अनुकंपाची 35 पदे भरली होती. या भरतीमध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

            जिल्हा परिषद मधील अनुकंपा नियुक्ती बाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. हा विषय तात्काळ मार्गी लावण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत सांगितले होते. त्यानुसार अनुकंपाची पदे तातडीने भरली आहेत. या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेत पदोन्नतीचा विषय सुद्धा मार्गी लागणार असल्याने कर्मचाऱ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनुकंपा तत्वावर भरण्यात आलेल्या पदामध्ये कनिष्ठ सहाय्यक 2, वरिष्ठ सहाय्यक 1, आरोग्य सेवक 1, विस्तार  अधिकारी सांख्यिकी 1, शिक्षण सेवक 16, कनिष्ठ अभियंता 2, परिचर 13, अंगणवाडी पर्यवेक्षिका 2, ग्रामसेवक 2 अशा  एकूण 40 पदांचा समावेश असून ही सर्व पदे  भरण्यात आली आहेत. अनुकंपा ही शैक्षणिक पात्रता व प्रवर्गात रिक्त असणाऱ्याना ज्येष्ठतेप्रमाणे देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व संवर्गातील पदोन्नती सभा 27 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित करण्यात आली

27 ऑगस्ट रोजी पदोन्नती सभा घेऊन सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी सांगितले. पदोन्नतीमध्ये ही सर्वांना समान न्याय देण्यात येणार आहे. अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाच्या कर्तव्याचे जबाबदारीने निर्वहन करावे व सर्व सामान्य नागरिकांची कामे वेळेत पार पाडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.