
भंडारा:- भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन पुरवठा करणारी सेंट्रल लाईन मध्ये अचानक लिकेज झाले यामुळे तिथे स्पोट झाला. ही घटना आज शुक्रवार ला 11 वाजता च्या सुमारास घडली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवून आगीवर तातडीने नियंत्रण आणले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
जानेवारी महिन्यात शिशु केअर युनिटमध्ये घडलेल्या अग्नि कांडात 11 बालकांना आपला जीव गमवावा लागला होता अशी दुर्घटना पुन्हा घडते की काय अशी धास्ती येथील रुग्ण व उपस्थित नातेवाईकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांनी केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांना तातडीने अन्य वार्डात हलविले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली